
Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहे. आज सकाळी महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोल नाक्याजवळ भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातातून तीन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बीएमडब्यू कार मुंबईहून नागपूरकडे निघाली होती. कार महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली.
तर चालकालाही गंभीर दुखापत झाली. अपघातातून ३ वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. समृद्धी महामार्गावर दररोज अपघातांच्या घटना घडत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पोलीस निरीक्षक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
नेहा चव्हाण असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस निरीक्षक महिलेचे नाव आहे. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त पोलिस हे परभणी येथून आरोपी घेऊन नागपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. पांढरकवढा गावानजीक त्यांचे वाहन आले असता समोर जात असलेल्या एका ट्रकला त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात पोलीस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


