Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातात नागपूरचे माजी रणजीपटू आणि व्हीसीए आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी या जागीच ठार झाल्या. 

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघात व बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (१८ एप्रिल) झालेल्या भरधाव कार मालवाहू वाहनाला धडकून झालेल्या अपघातात माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

हाअपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर यांना अपघात झाल्यानंतर प्रारंभी मेहकर ग्रामीण रुग्णालय त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या असून ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply