Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी, कारचा अक्षरश: चक्काचूर

Buldhana News : समृद्धी महामार्गावर अपघातांचा मालिका सुरुच आहे. महामार्ग सुरु झाल्यापासून इथे झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजही महामार्गावर अपघात झाला आहे, मात्र सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरबीड ते मलकापूर पांग्रानजीक मुंबई कॉरिडोर चॅनल नंबर ३०६.३ या ठिकाणी अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी होऊन हा अपघात झाला.

अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. पार्थ हरपाल वय ३४ वर्ष राहणार राजकोट असं जखमी कारचालकाचे नाव आहे. ही कार वाशीमहून मुंबईच्या दिशेने जात होती. 

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार कारागृहातून सुटका, केंद्रीय गृह सचिवालयाचे निर्देश

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमी कार चालकास तात्काळ सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूकही संथ झाली होती. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply