Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) भीषण अपघात झाला. सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा समावेश आहे. तर, रितेश भानादकर (वय २४)  आणि आशिष सरवदे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Rohit Pawar : लडेंगे जितेंगे...; ईडीने बारामती अॅग्रोवर कारवाई केल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. 

तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक ४३६ वर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

अपघातामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply