Samruddhi Mahamarg : मेहकर टोल नाका केला कर्मचाऱ्यांनी बंद; दोन महिन्यापासून पगार नसल्याने संतप्त

बुलढाणा : समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी टोल नका सुरु करण्यात आला आहे. यात मेहकर येथील असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी काम  बंद आंदोलन सुरु केले आहे मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल नाक्यावरील दोन महिन्यापासून पगार नाही. दिवाळीत पगार होईल अशी अपेक्षा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना होती. परंतु रोडवेज कंपनीने पगार दिला नाही. याकरिता टोल नाका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोल नाका बंद केला आहे. सदर टोल नाक्यावरून जाणाऱ्या सर्व गाडी मालकांनी टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता गाड्या टोल नाक्यातुन बाहेर जात आहेत. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप केले नाही. या पूर्वी फास्ट गो कंपनीने पहिले मेहकर फर्दापूर टोल नाका चालवण्यासाठी घेतला होता. यांनी कर्मचाऱ्यांचे पीएफ न देता कंपनी सोडून दिली व रोडवेज सोलुशन कंपनीला समृद्धी फरदापुर टोलनाका चालवण्यासाठी दिला.

Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरूवात!

रोडवेज सोल्युशन कंपनीने सुद्धा या मुलांचा पीएफ न देता दोन महिन्याचा पगार सुद्धा दिला नाही. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार पत्र दिलेले नाही. पगार पत्र नसल्या कारनाने पीएफ सुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला जर कंपनी बदलत राहीली, तर पीयफ कोणती कंपनी मुलांचे पगार पीयफ देणार असा सवाल उपस्थित होत आहे..

कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी 

गाड्यांसाठी टोल नका खुला करत यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यानी घोषणाबाजी करित टोल मोफत केला आहे. जोपर्यंत पगार व पीएफ मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी टोल नाक्यावर आंदोलन करत सर्व वाहने फ्री सोडत राहणार अशी भूमिका घेतली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply