Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडला जाणार, नवा एक्स्प्रेसवे तयार, 'या' महिन्यापासून करता येणार प्रवास

Mumbai Delhi Expressway: मुंबई ते नागपूर या दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता देशाची राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे. ४.२ किमी लांब 'आमने ते बडोदा - मुंबई द्रुतगती मार्ग' पूर्ण झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या ७०१ किमी लांब महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर वीस तासांवरुन आठ तासांवर आला. हा देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग आहे. ६२५ किमी लांब हा महामार्ग इगतपुरी-नागपूर-इगतपुरी अशा तीन टप्प्यांमध्ये सुरु आहे. आता हा महामार्ग थेट दिल्लीशी संलग्न होणार आहे. त्याच्या जोडरस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे.

HMPV First Case in India : मोठी बातमी! चीनमधील विषाणू भारतात दाखल? HMPV चा पहिला रूग्ण बंगळुरूत आढळला

बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग नव्याने उभारला जात आहे. 'एनएचएआय'च्या मुंबई मुख्यालयांतर्गत सर्व १०३ किमी लांब रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. रस्त्याच्या बांधकामाला सुरुवातही झाली आहे. जून महिन्यापर्यत बांधकाम पूर्ण होईल असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. हा महामार्ग दक्षिणेकडे आमनेनंतर अंबरनाथजवळील भोज आणि तिथून पुढे मोरबेपर्यंत (तळोजाची पूर्व बाजू) तयार केली जाणार आहे. त्यानंतर महामार्ग जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणापर्यंत (जेएनपीए) नेला जाणार आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply