Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर कांदा घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

washim Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. दर दोन दिवसांनी समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकरी यंत्रणाकडून अनेक उपाययोजना राबविण्याचे काम सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा समृद्धी अपघातावर भीषण अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. समृद्धी महामार्गावर कांदा घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

समृद्धी महामार्गावर शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतूक वाढली आहे. त्याचबरोबर या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चिंता व्यत्त करण्यात येत आहे.

अशातच शिर्डीवरून नागपूरकडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. कांद्याचा ट्रक पुलावरून खाली कोसळून आग लागल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजाच्या चॅनेल क्रमांक १७८ वर ही अपघाताची घटना घडली आहे. ट्रकमधील दोघांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ट्रक चालकाला डूलकी लागल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक समृद्धी महामार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून आतमध्ये पडला, त्या कठड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेलची टाकी फुटली. त्यानंतर ट्रकने भीषण पेट घेतला. त्याची माहिती मिळताच प्रथम महाराष्ट्र सुरक्षा बल त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

अपघातानंतर नगरपरिषद अग्निशामक दल व कारंजा शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशन कारंजा व अग्निशामक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

या अपघातात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामध्ये असलेले चालक व क्लीनर जळून जागीच ठार झाले आहे. त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले आहे. अपघातानंतर आगीचा धूर हा समृद्धी महामार्गावर दूरवर दिसत होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply