Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर विश्रांती घेणाऱ्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Samruddhi Highway :  अपघातांच्या  मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर  पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. यात जवळजवळ अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात दरोडेखोरांनी पळवून नेला आहे. ही धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर काल रात्री 3. 30 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांसह रोख दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास  

समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कारने (कार क्रमांक MH 12 JC 1919) मुंबईकडे जात होतं. या प्रवासादरम्यान रात्री 3-3.30 वाजेच्या सुमारास कारचाारकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ति त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली.

Sharad Pawar : “राजकारणात बालबुद्धी असलेले लोक”, अजित पवारांच्या त्या विधानावर शरद पवारांचा टोला

त्यानंतर सशस्त्र दरोडेखोरांनी कार मधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. या कुटुंबाचा नाईलाज असल्याने त्यांनी भयभीत होऊन होतं नव्हतं ते सारं त्यांच्या स्वाधीन करून जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. तसेच सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये त्यांच्या स्वाधीन केले. 

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी?

या अज्ञातांचा उद्देश सफल होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. काही वेळानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तात्काळ पोलीस मदत न मिळाल्याने सकाळ झाल्यानंतर या कुटुंबाने मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून सशस्त्र अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला तर नाहीये ना, रात्री पोलिसांची मदत का मिळाली नाही? असे अनेक प्रश्न या निमत्याने उपस्थीत केले जात आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply