Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर निलगायीला वाचविण्यात ट्रक पलटी; दारूच्‍या बाटलीसाठी नागरीकांची धावाधाव

वर्धा : समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना महाकाळ शिवारात घडली. यावेळी ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटलसाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. जेवढ्या हाती येतील तेवढ्या बॉटल घेत अनेकांनी पळ काढला. दारूबंदी जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच चांदी झाली. 

नागपुरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपुरच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी ब्रेक मारला. मात्र यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. ही घटना महाकाळ शिवारातील चॅनेल नंबर ५२ प्लस २०० नजिक घडली.

नागरीकांची बाटल्‍या उचलायला धाव

सदर घटनेत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्याची चर्चा आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *