Sameer Wankhede : मोठी बातमी! समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत दिलासा कायम, पण घातल्या दोन अटी

Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

अटकेपासून संरक्षण देताना न्यायालयाने त्यांच्यासमोर काही अटीही ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल करता येणार नाही.

समीर वानखेडे याची अटकेपासून संरक्षण याचिका केली होती. याबद्दल न्यायालयात युक्तिवाद करताना वानखेडे यांचे वकील म्हणाले की, ''हे सर्व एका चांगल्या अधिकार्याला हैराण करण्यासाठी सुरू आहे. त्यांना अंधारात ठेऊन, समीर यांनी आर्यन खान प्रकरणात काहीही केलं नाही.''

सीबीआयचाने काय केला युक्तीवाद?

याचिकेविरोधात युक्तीवाद करताना न्यायालयात सीबीआयचे वकील वकील कुलदीप म्हणाले की, समीर वानखेडे यांची चौकशी अद्याप अपूर्ण आहे. अद्याप काही महत्वाचा खुलासा वानखेडे करायला तयार नाही. चौकशीतील महत्वाचा भाग मी डिस्क्लोज करू शकत नाही. शाहरुख खान सोबत केलेला संवाद त्यांनी खुला केला. हे सरकारी नौकरी नियमांचं उल्लंघन आहे.

 
You May Like


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply