Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 2 परप्रांतीय तरुणींसह 4 महिलांची सुटका

Sambhajinagar News : छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणं समोर येत आहेत. पोलीस या प्रकरणी कारवाई देखील करत आहेत. मागील महिन्यात देखील छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी मोठ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. आताही पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली आहे. 

छत्रपती संभाजी नगरमध्ये देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत त्यांनी 4 तरुणींची सुटका केल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये चिकलठाणा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चिकलठाणा परिसरात अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Namo Rojgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन; काका-पुतणे एकाच मंचावर येणार?

'अशी' केली कारवाई

हॉटेल सिद्धांत बियर बारमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 2 परप्रांतीय तरुणींसह 4 महिलांची सुटका  केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना या प्रकरणाची मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला होता. बनवाट ग्राहकाने पोलिसांच्या पथकाला इशारा दिला. ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी आरोपी जिवन केसरसींग जालवाल याच्या विरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply