Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये दगडफेक, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवलं; अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील विश्रांत नगर भागात आज (बुधवार) अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिका प्रशासनाच्या पथकासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी स्थानिकांनी गोंधळ घालत कारवाई थांबविण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फाेडत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु ठेवली. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी आज महापालिका प्रशासन पोलिसांच्या फौज फाट्यासह दाखल झाले हाेते. यावेळी स्थानिक नागरिकांनी कारवाईस विरोध दर्शविला. नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.

Navneet Rana : इम्तियाज जलील यांच्या 'त्या' विधानावर खासदार नवनीत राणा भडकल्या; थेट ओपन चॅलेंजच दिलं

यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने समावेश हाेता. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 जेसीबी, अग्निशामक दलाच्या गाड्या सोबतच पोलीस प्रशासनाने देखील दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी हाेते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे देखील घटनास्थळावर हाेते.

ही कारवाई हाेऊ नये यासाठी स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना प्रशासनाने न जुमानता काही ठिकाणचे अतिक्रमण उद्धवस्त करुन टाकले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply