Sambhajinagar News : हॉटेलमध्ये गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; संभाजीनगरमधील घटना

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये धुडगूस घालत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दमदाटी करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही जण धुडगूस घालत होते. हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी थांबवलं असताना त्याच टोक्याने पोलिसांवरही दादागिरी करण्यास सुरवात केली. कर्तव्यावर असलेल्या दोन फौजदारांना ८ ते १० जणांच्या टोळक्यानी धमकावत मारहाण केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Crime News : चोरीपूर्वी देवापुढं केला नवस, हाती घबाड लागताच १ लाख केले दान अन् भंडाराही घातला

१० जणांवर पोलिसात गुन्हा दाखल

टोळक्यासह हॉटेलमध्ये धुडघुस घालत असलेल्या माऊली आमले याला समजावण्यासाठी गेलेल्या कर्तव्यावरील दोन पोलीस फौजदारांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली. त्यावरून माऊली आमले याच्यासह इतर आठ ते दहा जणांच्या टोळक्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

दरम्यान संभाजीनगरमधील घडलेल्या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून गोंधळ घालणारे यात दिसून येत आहेत. दरम्यान या प्रकारातील माऊली आमले असे संशयित आरोपीचे नाव आहे. आमले हा युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. हा सीसीटीव्ही पोलिसांनी तपासात त्या अनुषंगाने गोंधळ घालणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply