Sambhajinagar Crime : एक्स- रे काढायला गेलेल्या तरुणीला चक्क कपडे काढायला लावले, घाटी रुग्णालयातील संतापजनक प्रकार

Sambhajinagar Crime : एक्स-रे काढाण्यासठी गेलेल्या तरुणीला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये घडला आहे. रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसतानाही घेतला एक्स-रे काढण्यासाठी तरुणाला निर्वस्र करून अंगालाही स्पर्श केला. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टेक्निशियनने टॉप काढायला लावत निर्वस्त्र करून तिच्या अंगाला स्पर्श केल्याची धक्कादायक घटना घडली. महत्वाचे म्हणजे हा एक्स-रे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचही समोर आले आहे. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर तो घाटीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. मात्र कंत्राट संपल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले होते. परंतु तरीही विभागात त्याचे येणे जाणे सुरू होते. याप्रकरणी आरोपी शेख मोहम्मद फरहान शेख नईमुद्दीन यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mumbai : PM मोदींच्या दौऱ्याआधी मोठ्या घडामोडी! काँग्रेसचं आंदोलन, खासदार वर्षा गायकवाड स्थानबद्ध; मुंबईत वातावरण तापलं!

देशभरात आणि राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना संताप आणि चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. अशातच संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातून हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या महिला देखील आता सुरक्षित नसल्याची घटना घडली. छातीमध्ये त्रास होऊ लागल्याने एका तरुणाला एक्स-रे काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. ही तरुणी एक्स-रे काढण्यासाठी घाटी रुग्णालयात आली होती. त्यावेळी कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने एक्स रे रूममध्ये अनाधिकृत प्रवेश केला आणि चक्क तिला टॉप काढायला लावून तिला निर्वस्त्र होण्यास प्रवृत्त करून तिच्या अंगाला अश्लील स्पर्श केला.

तीन दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी घाटी प्रशासनाला जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी वर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. घाटी रुग्णालयात घडलेल्या सगळ्या प्रकरणी अधिष्ठातांनी चौकशी समिती नेमलेली आहे. दरम्यान या घाटी रुग्णालयात एवढ्या विश्वासाने महिला येतात मात्र अशाच प्रकारच्या घटना समोर येत असल्याने महिलांचा वाली कोण हाच आता सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. शिवाय कोलकत्याच्या घटनेनंतर ही घाटी प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply