
Sambhajinagar Crime : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एआय चेहऱ्याआडून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवसांत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले. यादरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता सेवानिवृत्त अधिकाऱ्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात ९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस सध्या तपास करत आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशाप्रकारचे फेक कॉल येत असतील तर नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले ७७ वर्षीय पोलिस अधिकारी हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. २ जुलै २०२५ रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. संजय पिसे असे नाव असून आपण नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली. सुरूवातीला त्यांना हा फोन फेक असल्याचे लक्षात आले नाही.
फोन केलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितले की, तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात २ कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला असून त्याच्याकडून तुम्हाला २० लाख रुपये आल्याने एनआयएकडून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची थाप मारली. तक्रारदार घाबरून गेले. फोन करणाऱ्याने थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला होता.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

