Sambhajinagar Corporation : होर्डिंग एजन्सीकडे महापालिकेचे थकले ६ कोटी ९० लाख रुपये; आता जाहिरात लावू न देण्याचा इशारा

Sambhajinagar Corporation :  शहरात लावलेल्या जाहिरातींसाठी होर्डिंग्स एजन्सीकडे महापालिकेचे तब्बल ६ कोटी ९० लाख रुपये ठाकले आहेत. यामुळे हि थकीत रक्कम भरण्यासाठी महापालिकेने इशारा देत थकीत रक्कम भर अन्यथा जाहिराती लावू देण्यात येणार नाही. 
 
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकांनी होर्डिंग एजन्सी धारकांना आता पुन्हा एकदा इशारा दिला आहे. गेल्या ५ वर्षापासून होर्डिंग एजन्सी धारकांकडे महापालिकेचे तब्बल ६ कोटी ९० लाख रुपये रक्कम थकले असून व्याजासहित ही रक्कम आता दहा कोटीच्या वर गेली आहे. मात्र, वारंवार सूचना आणि नोटीस देऊन देखील होर्डिंग धारकांनी ही रक्कम भरलेली नाही. यामुळे महापालिका प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. 
 
महापालिका प्रशासनाने थकीत रक्कम भरण्याबाबत इशारा देत रक्कम भरली नाही तर एकही होर्डिंग लागू देणार नाही; असा कडक इशारा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला. दरम्यान शहरात असणाऱ्या धोकादायक होर्डिंग आणि टॉवर पाडण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली जाईल असेही प्रशासकांनी सांगितलय.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply