Sambhajinagar Accident News : दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू; 13 जखमी

Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर 12 ते 13 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांची माहिती कळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर महामार्गावर पिकप आणि दुसऱ्या मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलिस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
 
दुसरीकडे वैजापूर मध्ये एका प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाचा आणि कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये 12 ते 13 जण जखमी झाले आहेत. मुंबई नागपूर महामार्गावरील वैजापूर शिवारातील लाडगाव चौफुलीवर हा अपघात झाला. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी वैजापूरच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply