Sambhajinagar Accident News : डंपरची रिक्षाला मागून जोरदार धडक; अपघातात १३ जण गंभीर जखमी

Sambhajinagar Accident News : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे घडला.

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर आणि रिक्षाचा  अपघात झालाय. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या डंपरने प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका अँपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात जवळपास १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावरघडलेल्या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दखल करण्यासाठी मदत केली. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात  हलवण्यात आले असून जखमीमध्ये ८ वृद्धांचा समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल

अपघातानंतर हायवा घेऊन चालक फरार  

दरम्यान ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये रिक्षाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात होताच डंपर चालकाने वाळूच्या डंपरसह घटनास्थळावरून धूम ठोकली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply