Sambhaji Nagar : संभाजीनगर व धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

Sambhaji Nagar : औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर व उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेववर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

Jalna Bus Accident : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पुलाखाली कोसळली

दोन्ही शहरांच्या नामांतराला याआधीही याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. नामांतराच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती; परंतु शासकीय निर्णयानंतर याचिका दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.

दोन्ही जिल्ह्यांच्या व महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नसल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने ३० ऑगस्टला आव्हान याचिका निकाली काढली. औरंगाबाद जिल्हा व उस्मानाबाद जिल्हा तसेच या दोन्ही जिल्ह्यांच्या बाबतीत उपविभाग, तालुका व गावस्तरावर नामांतर करण्याच्या प्रक्रियेबाबतची अंतिम अधिसूचना अद्याप जारीच झालेली नाही.

त्यामुळे त्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिका सध्या निरर्थक ठरत असल्याने निकाली काढाव्यात, अशी विनंती राज्य सरकारतर्फे राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्या निकाली काढल्या; मात्र त्याच वेळी राज्य सरकारकडून अंतिम अधिसूचना काढल्यानंतर त्याला आव्हान देण्याची मुभा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कायम ठेवली होती. त्याप्रमाणे याचिकाकर्त्यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. वकील युसूफ मूछाला, प्रज्ञा तळेकर आणि इतरांनी मिळून ही याचिका दाखल केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply