SA vs BAN, T20 WC : दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! अवघ्या २४ तासात मोडून काढला टीम इंडियाचा महारेकॉर्ड

SA vs BAN, T20 WC : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत नवख्या संघांनी बलाढ्य संघांना धूळ चारली आहे. तर बलाढ्य संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. अनेक असे सामने पाहायला मिळाले आहेत ज्यांचा निकाल हा शेवटच्या षटकात लागला आहे. असाच काहीसा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अटीतटीची लढत देत ४ धावांनी बाजी मारली. यासह त्यांनी भारतीय संघाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ धावांनी विजय खेचून आणला.

IND Vs PAK: पुढचा भारत-पाक सामना होणार लाहोरमध्ये? CT बाबत पीसीबीने दिली मोठी अपडेट

न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर आतापर्यंत लो स्कोरिंग सामन्यांचा थरार पाहायला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघाला बांगलादेशविरुद्ध खेळताना अवघ्या ११३ धावा करता आल्या. हे आव्हान बांगलादेशने जवळजवळ पूर्ण केलंच होतं. मात्र कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांच्या शानदार गोलंदाजीच्या बाकावर दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात हा सामना जिंकला.

यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावे होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने अवघ्या २४ तासांच्या आत हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळताना ११९ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ६ धावांनी विजय मिळवला होता.

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारे संघ :

११४ धावा - दक्षिण अफ्रीका विरुद्ध बांगलादेश, न्यूयॉर्क २०२४

१२० धावा - श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, चटगाव ,२०१४

१२० धावा - भारत विरुद्ध पाकिस्तान न्यूयॉर्क,२०२४

१२४ धावा - अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज, नागपुर २०१६

१२७ धावा - न्यूझीलंड विरुद्ध भारत,नागपुर २०१६

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply