Rs.2000 Note : दोन हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट; RBI कडून नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Rs.2000 Note : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आज म्हणजेच ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. आरबीआयने आता ही मुदत वाढवलीये. आता तुम्ही ७ ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी आणखी आठवड्याभराचा अवधी मिळालाय.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २३ मेपासून नोटा बँकेत जमा करण्यास सुरुवात झाली. याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर देण्यात आली होती. मात्र तरीही अनेक व्यक्तींनी आपल्या नोटा बदलेल्या नाहीत. नोटा चलनातून बाद झाल्यावर त्या व्यवहारात नसतील. यात कुणाचेही नुकसाना होऊ नये म्हणून आरबीआयकडून ही मुदत आणखीन वाढवण्यात आली आहे.

२००० रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यास सांगितल्यावर अनेक ठिकाणी या नोटा स्विकारणे बंद करण्यात आले. शॉपींग मॉल्ससह, गोल्ड शॉप आणि देवळातही दान करताना २ हजारांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत असे सांगण्यात आले होते.

Ahmedabad Passenger : डबे सोडून पुढे धावू लागलं अहमदाबाद पॅसेंजरचं इंजिन; प्रवाशांमुळे टळला अनर्थ

नोट बदलण्यासाठी नियमावली

नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून काही नियमावली देण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्ही फक्त २०,००० रुपये किंमतीपर्यंत नोटा बदलू शकता. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नोटा बदलायच्या असतील तर तसे करण्यासाठी तुम्हाला बँकेला पॅनकार्डचे डिटेल्स द्यावे लागतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply