Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळापासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; रोजचं नियोजन कसं असेल?

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra :  युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे  आमदार रोहित पवार यांनी  युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली. यावेळी आमदार अशोक पवार रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा

ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाववरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान, पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला. या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले. दरम्यान युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. आज यात्रेचा पहिला दिवस आहे. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.

Nilesh Rane Retirement : निलेश राणेंचा राजीनामा स्थान बळकट करण्यासाठी?

यात्रेचं नियोजन कसं असेल?

आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव,  नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रत्येक गावातील प्रश्न कळणार

रोहित पवार म्हणाले की, 'या यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरदेखील भविष्यात काम करण्याचं नियोजन करणार आहे. सगळ्या  नागपूर अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे. त्या समस्या जाणून घेणारं कोणी नाही. त्यांच्यासाठी मी असणार आहे. त्याचे प्रश्न जाणून घेणार आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply