Rohit Pawar ED Inqury : आजोबांचा आशीर्वाद, ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आत्याची सोबत; रोहित पवार चौकशीसाठी दाखल,

Rohit Pawar ED Inqury :  बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं  चौकशीसाठी समन्स बजावलेलं. रोहित पवार यांना आज म्हणजेच, 24 जानेवारीला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेलं. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झालेत. साधारणतः सकाळी साडेदहा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. 

आमदार रोहित पवार यांची आज मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवार ट्रायडन्ट हॉटेलवरुन निघाल्यापासून ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्वात आधी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबईतील पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे  स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आलेल्या. दरम्यान, ईडी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

Pune News : जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ; मतदारांची संख्या सहा लाखांच्या घरात, ‘कॅंटोन्मेंट’ सर्वांत लहान

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. अशातच 19 जानेवारी रोजी ईडीनं रोहित पवारांना समन्स धाडलं आणि 24 जानेवारी म्हणजेच, आज चौकशीसाठी हजर राहण्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार, आज रोहित पवार चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले आहेत. 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply