Rohit Pawar : घाबरु नका, आजही बाप माणूस माझ्या मागे उभा आहे, ED चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन!

Rohit Pawar :  सरकारच्या दबावाखाली  ईडीने  काही चुकीची कारवाई केली तर घाबरुन जाऊ नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ईडी चौकशीबाबत दिली आहे. ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं तसंच आताही करणार आहे. शरद पवार बाप माणूस म्हणून ढाल बनून उभे राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा  सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा  आहे, असे आवाहन  रोहित पवारांनी केले आहे.

रोहित पवार म्हणले, ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं. तसंच आताही करणार मात्र सूडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर
सरकारचा दबाव आहे. दबावाखाली माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केल्यास घाबरुन जाऊ नये. पवार साहेबांसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं. कारण कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. माझ्या कुटुंबासाठी, कोवळ्या वयातील मुलांसाठी हे राजकारण न समजण्याच्या पलिकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत.

Mumbai News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी दोन तास वाहतूक ब्लॉक

वय झालं म्हणून काय झालं?

रोहित पवार म्हणाले,  उद्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार माझ्यासोबत येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply