Rohit Pawar : 'मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत', चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर रोहित पवार संतापले

Rohit Pawar : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात सर्रासपणे लहान मुले ड्रग्ज सेवन करत असल्याचा आणि विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंबंधी एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असे मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांच्या याच विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथाइडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे.

Buldhana Bus Fire : बुलढाण्यात खाजगी बसला भीषण आग, ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

"आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे. पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply