Rohit Pawar : महायुतीकडून दोन हजार कोटींचे वाटप ; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीत महायुती व मित्र पक्षांकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात दोन हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

याबाबतचे अनुभव दोन टप्यांतील निवडणुकांमध्ये दिसले. बारामतीत १५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका, टॅंकरमधून पैसा आणल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. प्रचार दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेले आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Pune Lok Sabha : पर्वती विधानसभेतून महायुतीला भरघोस मताधिक्याची अपेक्षा, मात्र धंगेकरांची होती तगडी फिल्डींग

पवार म्हणाले की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात झाली आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला होता. त्यावर पवार म्हणाले की, मुख्यमंत्री मुक्कामी राहणार नव्हते.

आता फाईल सही करू शकत नाहीत. असे असाताना ९ बॅगा कशासाठी आणल्या, हा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक आणि दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य आहेत. महायुतीचे उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे नाशिक, दिंडोरीतही पैसेवाटप होईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत यांच्या ८०० कोटींच्या भूसंपादन गैरव्यवहाराच्या आरोपावर बोलताना त्यांनी दोन वर्षांत सरकारने हजारो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जायला भीती वाटत आहे. सामान्य माणूस धडा शिकवेल, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे नाशिकमधील मोदी यांच्या सभेची जागा बदलल्याचा टोला पवार यांनी लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply