Rohit Pawar : व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत, असा टोला रोहित पवार यांनी हाणला आहे. या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उद्या म्हणजेच मंगळवारी (७ मे) मतदान होणार आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात ही लढत झाल्यानं देशात चर्चिली गेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

Raigad Lok Sabha : मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…", अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

व्वा दादा व्वा! सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे, असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply