Rohit Pawar : छगन भुजबळांंमागे अदृश्य हात? मराठा ओबीसी वादावर रोहित पवारांचे मोठे विधान

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रोहित पवार यांच्या या यात्रेला नागरिकांचा, तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ही संघर्ष यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. या दरम्यान, आज (सोमवार, २० नोव्हेंबर) रोहित पवार यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

काय म्हणाले रोहित पवार?

"अगोदर 3 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला अन त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश केल्यानंतर सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर केले. सुरुवातीला दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील मदत आणि नंतर दुष्काळ जाहीर केलेल्या 8 तालुक्यातील मदत यामध्ये तफावत आहे. आता शेतकऱ्यांना मुलाच्या फीची चिंता आहे.." असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

New Delhi : दिल्लीत थोरले अन् धाकटे पवार आमने-सामने, अजितदादा पहिल्यांदा सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता

युवांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा...

"युवांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी ही यात्रा काढली आहे. मुद्द्याचं बोला अस आम्ही नेत्यांना बोलत आहोत. जर या शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढू शकतील.." अशी चिंताही आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply