Rohit Pawar : अरविंद केजरीवालांसारखी कारवाई माझ्यावरही होईल; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी कारवाई माझ्यावरही करतील, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरी भूमिका घेतल्याने माझ्यावर कारवाई झाली, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीत माझ्यावरील कारवाईबाबत चर्चा झाली, असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

भाजपच्याच लोकांनी मला याबाबत माहिती दिल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे. रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भाजपक़डून सुडबुद्धीने कारवाई केली जातेय का? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar : नवनीत राणांना ५ वर्षांपूर्वी उमेदवारी देऊन चूक केली; शरद पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी

काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला. या कारवाईनंतर रोहित पवार सातत्याने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे.

'अरविंद केजरीवालांसारखी माझ्यावरही कारवाई होईल'

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार सोमवारी (ता. २२) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी तेथील मतदारांसोबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. "माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. मात्र ते माहित असतानाही मीही भूमिका घेतली कारण ती खरी भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं", असं रोहित पवार म्हणाले.

"आमच्यावर बऱ्याच कारवाया झाल्या असून आणखीही होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे देखील माझ्यावर कारवाई केली जाईल, असं काही भाजपच्याच लोकांनी मला सांगितले आहे. मात्र, आम्ही त्यास घाबरत नाही. असं रोहित पवार यांनी ठामपणे सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply