Rohit Pawar : पिक्चर अभी बाकी है; अनेक आमदार साहेबांच्या संपर्कात... रोहित पवार यांचा मोठा दावा

Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे ठाकरे गट तसेच काँग्रेसमधील बडे नेते महायुतीत प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

"पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हाशरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला. हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकांना आपण परत घेऊ ," असे ते म्हणालेत.

Buldhana Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त, 43 जणांना अटक

तसेच "बारामती मतदार संघाचे नऊ सर्व्हे अजित पवार गटाकडुन झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमधे पुढे दिसत आहे. त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील. आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील," असा मोठा दावाही रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, यावेळी बोलताना रोहित पवार यांनी बारातमीमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला. "सागर बंगला काही गोष्टी अनेकांना देण्याचं केंद्र झालं आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडलं. भाजपचे देखील अनेक मतदार आता तुतारीला मतदान करतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखाच्यांवर असेल," असे रोहित पवार म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply