Rohit Pawar : लडेंगे जितेंगे...; ईडीने बारामती अॅग्रोवर कारवाई केल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar : ईडीच्या मुंबई कार्यालयाने बारामती अॅग्रो कंपनीवर कारवाई केली. ईडीने या कारवाईत कंपनीची राज्यातील विविध भागातील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ५०.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचं बोललं जात आहे. ईडीच्या कारवाईवर बारामती अॅग्रो कंपनीचे व्यवस्थापाक, आमदार रोहित पवार यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी...

ईडीने बारामती अॅग्रोवर कारवाई केल्यानंतर रोहित पवार म्हणाले, 'माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं… झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय'

Narendra Modi: PM मोदींकडून विकासकामांचा धडका; आज सेला बोगद्याचं उद्घाटन करणार, चीनला धडकी भरणार!

'ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.

'वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. लडेंगे जितेंगे, असे ते पुढे म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *