Rohit Pawar : ..त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच करेक्ट कार्यक्रम होईल; रोहित पवारांचा खोचक टोला

Rohit Pawar : महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नेते साथ सोडत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातील गळती थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. या बड्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. यावरुन थेट महाविकास आघाडीला फटका बसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे

काय म्हणाले रोहित पवार?

"महाविकास आघाडीतून  जे नेते बाहेर पडतील, यावरून महाविकास आघाडीला गळती नाही. तर भाजपमधल्या प्रवेशाने भाजप नेत्यांची डोके दुखी वाढेल. असे म्हणत पवारसाहेब यांच्यावर बोलण्याशिवाय भाजपचं गाडं पुढे चालतं नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल," असा दावाही रोहित पवार यांनी केला.

Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षांचा पक्षाला रामराम

"भाजप सरकार कायदा कधी बघत नाही. रश्मी शुक्ला यांच्यावर या पूर्वी ही कारवाई करण्यात आली. फोन टॅपिंगमुळे लोकसभा- विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, म्हणून रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देत असावेत. माझा अंदाजाने काही नंबरफोन टॅपिंगला दिले असावेत, त्यात माझाही नंबर असावा," अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.

"पवार विरूद्ध पवार हेच भाजपला हवं होतं, मात्र चाणक्य लोकं मतांतून निर्णय घेतील भूमिकेबद्दल मी काय बोलणार ? पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये या मताचा मी आहे. मात्र भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण आहे," असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply