Rohit Pawar: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे बोट…रोहित पवारांची मोठी मागणी, एकच खळबळ

रोहित पवार, किंजरापू राममोहन नायडूImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Rohit Pawar on Kinjarapu Rammohan Naidu: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वैमानिकाचा वापर करून हे विमान कोसळण्यात आल्याची शंका त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. तर VSR कंपनीला आणि त्याच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यापूर्वी केला होता. आज दिल्लीत आमदार रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्याची मोठी मागणी केली. त्यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले.

नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या

नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मागणी करत आहोत. राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा ही विनंती करतो. टीडीपीचे मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा. ही आमची मागणी आहे, असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. यापूर्वी सुद्धा त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे आणि देशातील बड्या राजकारण्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तर एक खासदार या कंपनीचा भागीदार असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता.

तेलगू देसमचे व्हीएसआरसोबत चांगले संबंध

व्हीएसआर कंपनीचे मालक आणि तेलुगु देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का अशी शंका यापूर्वी रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंत्री के. राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी या अगोदरही केली होती. अपघाताला आता इतके दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे या काळात खोटी कागदपत्रे तयार केली जात तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

बातमी अपडेट होत आहे…



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *