Rohini Khadse Demands on Women’s Day : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. महिलांना एक खून माफ करण्याची मागणी करण्यात आली असून त्यामागचं कारणही त्यांनी विषद केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, “सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे.”
महिलांना एक खून माफ करा
“आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल? नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
“आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू”, असंही त्या म्हणाल्या.
शहर
- Mumbai Local : ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल
- Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच
- Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं
- Kalyan Rain: कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, रिक्षावर झाड कोसळलं; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ
- Beed : अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची 'ती' घटना रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- Yavatmal : लग्न ठरलं, साखरपुडा झाला अन् अचानक मोडलं; इंजिनिअर तरूणीनं घरातच आयुष्य संपवलं, यवतमाळमध्ये खळबळ
- Manmad News : हिंदुस्थान पेट्रोलियम सर्व्हर डाऊन; पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा ठप्प
गुन्हा
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा
- Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर सुरूच; पाकिस्तानमधील आणखी १२ ठिकाणं टार्गेटवर