Riteish Deshmukh : कंठ दाटला, डोळे भरले अन् रितेश देशमुख मंचावर ढसढसा रडले

Riteish Deshmukh : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज लातूरमध्ये पार पडत आहे. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात ,पृथ्वीराज चव्हाण ,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेते रितेश देशमुख भाषण करता करता भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रितेश देशमुखांना रडू कोसळलं..

" वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आज आहे, असे म्हणत रितेश देशमुख मंचावर भावुक झाले. यावेळी आई वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, तसेच दिलीपराव देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं.

PM Narendra Modi : मला तिसऱ्या टर्मसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, पण...; PM नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

साहेबांचा पुतळा पाहू प्रेरणा घ्यावी...

"मुलगा म्हणून साहेबांनी कधीच रोखले नाही. त्यांनी आम्हाला सुट दिली होती. मुलांवर कधी कशाचा दबाव टाकू नये, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा घेतली पाहिजे. विलसासराव माणूस म्हणून काय होते हे समजेल. राजकारणात टीका कारा, पण व्यक्तिगत कोणावरही टीका करू नका हे विलासराव यांचे संस्कार आहेत आणि याचाच वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, तसेच आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो, वावरण्याचा प्रयत्न करतो, असे रितेश देशमुख यावेळी म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply