Rishabh Pant RR vs DC : ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आज करणार मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरणार फ्रेंचायजीचा पहिला फलंदाज

Rishabh Pant RR vs DC IPL 2024 : राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 9 व्या सामन्यात संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोन युवा विकेटकिपर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत भीषण अपघातानंतर नुकताच व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. पंत आज दिल्लीकडून आपला 100 वा आयपीएल सामना खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 100 वा सामना खेळणारा ऋषभ पंत हा पहिला खेळाडू होणार आहे.

ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या कारने पेट देखील घेतला. पंत या अपघातातून वाचला. मात्र त्याच्या गुडघ्या जबर दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आता पंत क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे. तो विकेटकिपिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व देखील करत आहे.

Pune : आदित्य ब्रिझ पार्क चा नवा आदर्श दररोज ३५० युनिट्स ची वीज निर्मिती

ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द

ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सुरूवात केली होती. त्याने दिल्लीकडूनच आयपीएल पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सशीच जोडला गेला आहे. 2016 नंतर पंत फक्त एका आयपीएल हंगाम मुकला आहे. 2023 च्या आयपीएल हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 99 सामने खेळले असून जवळपास 35 च्या सरासरीने 2856 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 148 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. तो टी 20 क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply