Ringan Sohala : संत तुकोबांच्या सोहळ्यात इंदापूरात रिंगण सोहळा दोन तास रंगला

इंदापूर - टाळ मृदुंगाचा गजर... आसमंतात फडकणाऱ्या पताका… श्रीविठूरायांचा जयघोष सुरू होता. बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्व व स्वाराचा मोहिते पाटील यांच्या अश्वाने वायुवेगाने दौड करीत पाच प्रदिक्षणा पूर्ण केल्या.

वारकऱ्यांना अक्षरक्षा घामाच्या धारा वाहत होत्या, तरी ही उडीच्या खेळात रमले होते. एक वाजता पालखी येथून मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण आज गुरुवारी इंदापूरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर पार पडला.

लागोनियां पाया विनवितो तुम्हांला । कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥

असे संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. रणरणत्या उन्हाच्या ३२ अंश सेल्सिअस तापमान असतानाही सलग दोन तास रिंगण सुरू होते. परंतु वारकऱ्यांच्या मधील उत्साह अधिक जास्तीचा होता.

निमगाव केतकी येथे गुरुवारी सकाळी संत तुकाराम महाराज संस्थान व ग्रामस्थांच्यावतीने अभिषेक पूजा केली. त्यानंतर काकड आरतीचे अभंग म्हणत सोहळा सहा वाजता इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. तरंगवाडी कॅनॉल व गोकुळीचा ओढा येथे विसावा घेतला. पावणे बारा वाजता पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी पोहचला.

नगारखाना पाऊणे अकरा वाजता पोचला. त्यावेळी, ३० अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामागे, २७ दिंडया व साडे अकरा वाजता पालखी रथ आणि त्यामागील ५० हून अधिक दिंडया रिंगणात आल्या. रिंगणाच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा पूर्ण केली. पाउणे बारा वाजता पालखी रथातून रिंगणाच्या मध्यभागी ठेवली.

दरम्यान, रिंगणाच्या ठिकाणी साडे अकरा वाजता नगरखाना पोचला. त्यामागे अश्व, २७ दिंड्या, संत तुकाराम महाराज पालखी रथ, त्यामागील दिंड्या पोचल्या. त्यानंतर, रिंगणाला उजव्या बाजूने प्रदक्षिणा पूर्ण केली.

सुरवातीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आशिष शेलार, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सारथ्य केले. त्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, माजी प्रदीप गारटकर, यांनी ही सारथ्य केले.

रिंगणात संस्थांनचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज देहुकर, सोहळाप्रमुख संजय मोरे, अजित मोरे, विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नितीन मोरे, बापूसाहेब मोरे, बाळासाहेब मोरे, प्रल्हाद मोरे, रामभाऊ मोरे, विश्वजित मोरे, मधुकर मोरे, सुरेश मोरे उपस्थित होते. देहुकर मालक यांच्या सूचनेनुसार चोपदार नामदेव गिराम, देशमुख चोपदार, कानसूरकर चोपदार यांनी रिंगण लावले. सोहळा प्रमुख भानुदास मोरे, सुनील मोरे यांनी सोहळ्याच्या सूचना ध्वनीक्षेपकावरून देत होते.

त्यावेळी पताकाधारी यांचे १२:५० ला रिंगण सुरू झाले. त्यानंतर, १२:५३ ला तुळस हांडेकरी महिला यांचे तर १२:५५ ला सेवेकरी म्हणजे पोलिस शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार धनंजय महाडीक धावले. विणेकऱ्यांचे १२ वाजता रिंगण पार पडले. यांनी प्रत्येकी तीन प्रदीक्षिणा पार पडल्या.

‘ज्ञानोबा- तुकाराम’ असा जयघोष सुरू झाला. त्यानंतर दोन्ही अश्वानचा मान दिला. पालखी समोर उडीचा खेळ रंगला. गुरुवारी मालकांच्या वतीने कीर्तन व जागर हटकळे दिंडी यांच्यावतीने झाले. शुक्रवारी सकाळी सोहळा सराटी गावाच्या दिशेने निघणार आहे.

राजकीय गर्दी

आजच्या या रिंगण्याच्या सोहळ्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आशिष शेलार, दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार विलास लांडे, प्रदीप गारटकर, इंदापूरचे माजी नगरसेवक भरत शहा, कृषी बाजार समितीचे संचालक भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहाल ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील, मुलगी अंकीता पाटील ठाकरे उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply