Republic Day 2023 : CM शिंदेंनी नवस केलेल्या कामाख्या देवीच्या रथानं वेधलं सर्वांचं लक्ष

Republic Day 2023 : देशभरात आज मोठ्या उत्साहात ७४ वा प्रजासत्ता दिन साजरा केला जात आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिल्लीतील कर्तव्य पथावर विविध कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी अनेक राज्यांच्या चित्ररथांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती आसामने सादर केकेल्या कामाख्य देवीच्या मंदिराच्या चित्ररथाची.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी मविआ सरकार पाडलं. त्यानंतर शिंदेंसह सर्व आमदार आसाममध्ये गेले होते. त्यानंतर राज्यात घडत असलेल्या सत्तांतराच्या नाट्यात शिंदेंसह सर्व आमदारांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेत नवस केला होता.त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर CM शिंदेंसह सर्व आमदार पुन्हा एकदा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतले होते.

CM शिंदेंच्या सत्तांतराची झाली आठवण

दरम्यान, राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आज प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर सादर करण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये आसाम राज्याने कामाख्य देवी मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ सादर करण्यात आला. हा रथ पाहताच सर्वांना काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात बंडखोरी करून अवघ्या देशाचं लक्ष वेधलेल्या CM शिंदेंसह सर्व आमदारांची आठवण झाली आणि पुन्हा एकदा सत्तांतर नाट्याची चर्चा सुरू झाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply