Republic Day : पुणे पोलिस धनंजय बारभाई यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

पुणे- शहर पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलिस फौजदार धनंजय छबनराव बारभाई यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

पोलिस दलात त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत भारत सरकारने गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना हे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे.धनंजय बारभाई हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील रहिवासी आहेत. ते सन १९९० साली पोलिस सेवेत रुजू झाले.

त्यांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय, फरासखाना, सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, भारती विद्यापीठ, पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा, पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडळ-१, परिमंडळ-३, सहायक आयुक्त वानवडी आणि स्वारगेट विभागात कर्तव्य बजावले आहे. त्यांना सेवाकालावधी २७७ बक्षीसे आणि ६३ हजार ४१४ रुपये असे रोख स्वरूपात मिळाले आहे.

पोलिस दलात त्यांच्या एकूण ३१ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वारगेट आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत केली.

खून खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, फसवणूक, ॲट्रासिटी, पॉक्सो अशा विविध गुन्ह्यांतील गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात त्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा झाली.

त्यांना २०१३ मध्ये पोलिस महासंचालक यांनी पोलिस पदक ‘सन्मानचिन्ह’ प्रदान करून गौरव केला आहे. त्यानंतर त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारत सरकारने २६ जानेवारी २०२३ साठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे.

राष्ट्रपती पोलिस पदक’ हा पोलिस दलातील सर्वोच्च सन्मान आहे. पोलिस दलात ३१ वर्षे चांगली सेवा केली. त्यामुळे हा सन्मान मिळाल्याचा खूप आनंद आहे. तसेच, पत्नी उदया आणि मुलगा शिवम यांच्यासह कुटुंबीयांतील आम्हा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

-धनंजय बारभाई, सहायक फौजदार.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply