Repo Rate Hike : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! RBI कडून पतधोरण जाहीर, तुमच्या EMI वर काही परिणाम होईल का?

RBI Announcement On Repo Rate : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व बॅक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयकडून नवीनतम आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2024 साठी पहिले पतधोरण जाहीर केले. यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी आरबीआयने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली होती. अलीकडे फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड यासह जगातील सर्व केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मे 2022 पासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शेवटच्या पॉलिसीपर्यंत व्याजदर 250 बेसिस पॉइंट्सनी वाढले आहेत.

तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँकची पतधोरणविषयक बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज अखेरचा दिवस होता. आरबीआय पुन्हा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी चर्चा रंगली असल्याने बैठकीकडे संपूर्ण कर्जधारकांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, आरबीआयनने पतधोरण जाहीर केलं आहे.

फेब्रुवारीमध्ये वाढला होता रेपो रेट

फेब्रुवारीमध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो रेट दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के करण्यात आला होता. किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उच्च विकास दर राखण्यासाठी मुख्य धोरण दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे आरबीआयने त्यावेळी सांगितले होते.

महागाईचा दर 5.5% राहण्याची शक्यता

घोष म्हणाले की, किरकोळ महागाईच्या आघाडीवर सध्या मोठा दिलासा अपेक्षित आहे. गेल्या 10 वर्षातील सरासरी महागाई दर 5.8 टक्के आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ महागाई दर 5.5 टक्के किंवा त्याहून खाली येण्याची शक्यता कमी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून, किरकोळ चलनवाढ RBI च्या आरामदायी 6 टक्क्यांच्या वर आहे. किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.52 टक्के होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply