Reliance Jio down : रिलायन्स जीओची इंटरनेट सेवा ठप्प, सर्व्हर डाऊन झाल्याने युजर्स संतापले

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जीओची इंटरनेट सेवा आज सकाळपासून (बुधवार) ठप्प झाल्याने अनेक युजर्सना अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. सकाळी १० वाजेपासून जीओचे सर्व्हर डाऊन असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसेच नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. दरम्यान रिलायन्स जीओकडून अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

डाऊनडिटेक्टरनुसार, सकाळी १० ते ११.३० च्या सुमारास त्यांच्याकडे ४०० पेक्षा जास्त जीओ युजर्सने खराब मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्शन आणि कॉल ड्रॉप होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यापैकी ६० टक्के तक्रारी खराब नेटवर्क मिळत असल्याच्या आहेत. या तक्रारी मुख्यत: मुंबई, चंदीगड, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांमधून आल्या आहेत.

दरम्यान, जीओची सेवा अचानक बंद झाल्याने युजर्सना समस्यांच्या सामना करावा लागतो आहे. अनेकांची कामे ठप्प पडली आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनीही याचा फटका बसला आहे. याबाबत युजर्सने ट्वीटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply