RBI Action News : आरबीआयची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर ६ महिने बंदी

RBI Action News : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने राज्यातील एका मोठ्या बॅंकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट बँकेवर कारवाई केली आहे. आता सहा महिने या बॅंकेच्या व्यवहारांवर बंदी असणार आहे. त्यामुळे संबंधित बॅंकेच्या ग्राहकांना या बॅंकेतून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. 

आरबीआयने या बॅंकेवर कारवाई का केली, असा प्रश्न समोर येत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर सहा महिने बंदी असणार आहे. कर्ज देणे किंवा ठेवी घेण्यावर बंदी असणार आहेत. ठेवीदार सहा महिन्यांसाठी पैसेही काढू शकत नाही, त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांनी या गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.  

Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढील ३ दिवस अवकाळीचा इशारा, मुंबईत उकाडा कायम

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आता बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ढासळलेलीआर्थिक स्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक निर्णय घेतले आहेत.

आरबीआयने या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर निर्बंध घातले आहेत. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही सहकारी बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही, असं आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

८ एप्रिल २०२४ पासून शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिने लागू राहतील. मात्र, या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. बँकेचीआर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

येस बँकेचे ४०० कोटींची फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी अजीत मेननला केरळमधून अटक करण्यात आली  आहे. तीन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखा आरोपीच्या मागावर होती.आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी आहे. मेनन विरोधात लूक आउट सर्क्युलर बजावण्यात आलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply