Ravindra Waikar Case : ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, सकाळपासून झाडाझडती

Ravindra Waikar Case : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. वायकर तसेच त्यांचे पार्टनर्स आणि निकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच ईडीने आपल्या धाडसत्राला सुरूवात केली आहे.

जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीचं धाडसत्र सुरू झालं आहे. सदर प्रकरणी एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुूरू आहे. भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

Political News : प्रियांका गांधी वर्ध्यातून निवडणूक लढवणार? लोकसभेसाठी काँग्रेसचा खास फॉर्म्युला!

नेमकं प्रकरण काय?

नोव्हेंबर २०२३ मध्ये रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने ईडी गुन्हा दाखल केला होता. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हायाबाबत अद्याप कोणालाही समन्स करण्यात आले नाही. मात्र आज या प्रकरणातील सर्व व्यवसायिक आणि रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. उद्या शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. निकालाच्या आदल्या दिवशीच ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply