Ravikant Tupkar : सोयाबीन, कापूस प्रश्नावर विदर्भ बंद करून दाखवणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

Ravikant Tupkar : काहीही झाले तरी चालेल, परंतु सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर एक वेळेस विदर्भ बंद करून दाखवू हे सरकारला माझ आव्हान आहे; असे वक्तव्य देवळी येथील शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपीय एल्गार सभा दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. 

वर्धा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. विदर्भाने महाराष्ट्राला चळवळी शिकवल्या आहेत. आज विदर्भातील चळवळी लुप्त होत चाललेल्या आहे. विदर्भाचा आदर्श घेऊन पश्चिम महाराष्ट्रात ऊस तसेच कांद्याबाबत चळवळी होत आहे. त्यामुळे माझं स्वप्न एक आहे. ज्याप्रमाणे जामुवंतराव धोटे यांच्या हाकेवर एका वेळेस विदर्भ बंद होत होता. त्याप्रमाणे सोयाबीन, कापसाच्या प्रश्नावर एका वेळेस विदर्भ बंद झाला पाहिजे. 

Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्गामुळे जमीन जाणार; संतप्त शेतकऱ्यांकडून चक्काजाम

आता विदर्भात लक्ष 

मी आमदार, खासदार नाही झालो तरी चालेल. त्याने काही फरक पडत नाही. परंतु विदर्भात चळवळी उभ्या झाल्या पाहिजे. आता महाराष्ट्रात फिरून पुष्कळ झाले. आता विदर्भात मी लक्ष देणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply