Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या 'या' चुकीची शिक्षा मिळाली हार्दिक पांड्याला... भारतीय दिग्गजांचे मोठं वक्तव्य

Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 : रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या हा नेतृत्वाचा बदल करताना संवादात स्पष्टता ठेवली असली तर हार्दिकला क्रिकेटप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला नसता. कर्णधारपदाबाबतचा हा बदल व्यवस्थितपणे हाताळता आला असता, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, एमआयच्या चुकीमुळे चाहत्यांच्या संतापाची शिक्षा हार्दिकला दिली जात आहे.

.हा भारतीय संघ नाही तर फ्रँचाईसी क्रिकेट आहे. त्यासाठी संघ मालक करोडो रुपये खर्च करतात, त्यामुळे ते बॉस असतात. कोणाला कर्णधार करायचे हा त्यांना अधिकार असतो. तरीही एवढा मोठा बदल करताना जर स्पष्टता असती आणि सावधपणे बॅटन पास करण्यात आला असता तर आत्ताची परिस्थिती आली नसती, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

IPL 2024: डी-कॉक-पूरनचं आक्रमण अन् मयंक यादवचा वेग, लखनऊने RCB ला घरच्याच मैदानात केलं चीतपट

आम्ही भविष्याचा विचार करत आहोत, नव्याने संघाची उभारणी करायची आहे. रोहितने कर्णधार म्हणून असामान्य कामगिरी केली आहे, हे प्रत्येकाला माहीत आहेच. पुढच्या तीन मोसमात तरी रोहितने हार्दिकच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सने रोहितऐवजी हार्दिक हा बदल सुरळीत झाला असता, असे शास्त्री यांनी सांगितले.

आम्हाला रोहित शर्मा नको आहे, असा चुकीचा संदेश सोशल मीडियावर गेला. त्यामुळे त्यांनी रोहितवर अन्याय झाला असा समज करून हार्दिकला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

शेवटी निकाल हाच महत्त्वाचा असतो, संघ विजयी होत असताना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. कधी कधी काही स्टोरी जाणीवपूर्वक तयार केल्या जातात. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य असते, असे शास्त्री यांनी सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply