Ratnagiri Rain Update : रत्नागिरीत २१ ते २५ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस भारतीय हवामान खात्याचा इशारा; शाळांना सुट्टी

Ratnagiri Rain Update : भारतीय हवामान खात्याने २१ ते २५ जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये,

यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना शनिवारीही (ता. २२) सुटी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? CM शिंदे तडकाफडकी दिल्लीला, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी सुटीचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २१) शाळांना सुटी देण्यात आली होती, त्यात शनिवारी सुटी दिल्याने रविवारपर्यंत सलग तीन दिवस शाळा बंद असणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply