Ratnagiri Rain : जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खेड पुराच्या उंबरठ्यावर, अनेक दुकानं पाण्याखाली

Ratnagiri News Heavy Rains: मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीने सकाळी ७ वाजेच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली आहे.

या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मटन-मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलं असून ७ ते ८ दुकानं पाण्याखाली आहेत.

Vadar Samaj Morcha : सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ

नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड नगर प्रशासनाने तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीच्या किनाऱ्यावर कुणीही जाऊ नये अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply