Ratnagiri News : रत्नागिरीला मुसळधार पावसाचा फटका, परशुराम घाटात भिंत कोसळली; जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दाेन दिवस पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेडसह चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. दूसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसऴल्याने धाेकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
रत्नागिरीसह खेड परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीपात्रात कमालीची वाढ हाेऊ लागली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी 5.25 मीटर इतकी वाढली आहे. काेकणातील या पट्ट्यातील पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रशासनाने ठाेस पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. खेड, चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply