Ratnagiri Crime : “आरजू टेक्सोल” फसवणूक प्रकरणी 115 जणांचे जबाब नाेंदविले, 2 संचालकांना अटक

Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यातील “आरजू टेक्सोल कंपनी” फसवणूक प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रसाद शशिकांत फडके याला पाेलिसांनी आज अटक केली. सुमारे 800 हुन अधिक लोकांची 'आर्जु'कडून फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनूसार “आरजू टेक्सोल कंपनी” यांच्या माध्यमातून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरु आहे. पाेलिसांनी सुमारे 115 जणांचे जबाब नाेंदविले आहेत. ही प्रक्रिया तक्रारदारांसाठी सुलभ व्हावी यासाठी नियाेजन केले आहे. तक्रारदारास वेळ दिली जात आहे. त्या वेळेत त्यांनी हजर राहून जबाब द्यावा असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

Buldhana News : पोलिसांची कार्यतत्परता! मुंबईवरुन अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाची शेगाव येथे सुटका

आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने दाेन संचालकांना अटक केली आहे. संजय गोविंद केळकर (वय 49, रा. तारवेवाडी, हातखंबा) आणि प्रसाद शशिकांत फडके (वय 34, रा. गावखडी) या दाेघांना अटक केली आहे. अन्य संशयितांचा पाेलिस शोध घेताहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply