Ratnagiri Accident : मोठी दुर्घटना! दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

Dapoli Accident : रत्नागिरी दापोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दापोलीतील आसूद जोशी आळी इथे ट्रक आणि वडाप गाडीमध्ये भयंकर अपघात झाला असून या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी - दापोलीतील आसूद जोशी आळी येथे दोन वाहनांमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि खासगी प्रवासी वाहनामध्ये हा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

मरियम गौफिक काझी (६ वर्षे) स्वरा संदेश कदम (८ वर्षे) संदेश कदम, (५५ वर्ष) अनिल सारंग (४५ वर्षं) फराह तौफिक काझी (२७ वर्ष) मिरा महेश बोरकर (२२,वर्ष) वंदना चोगले (३८) आणि समिया इरफान शिरगावकर अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. आज (२५, जून) दुपारी 3.30 सुमारास हा भीषण अपघात झाला.

ही धडक इतकी भयंकर होती की दोन्हीही गाड्यांचा यामध्ये अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातील 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींना मुंबईला हलवण्यात आले आहे. विनायक हशा चौगुले- ( वय,४५) श्रध्दा संदेश कदम (वय,१४) ,भुमी सावंत (वय, १७), मुग्धा सावंत (वय,१४) ज्योती चोगले (वय, ०९) अशी जखमींची नावे आहेत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply